Environment and Climate Change
Economy Environment Maharashtra

पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल – पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्य शासनाने महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केली असून येत्या काळात सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन विविध प्रकारचे साहित्य आणि इतर उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगासंदर्भातील प्रस्तावाबाबतचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतचा अभ्यास करण्यात येईल असे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. पर्यावरणपूरक उद्योगास शासन स्तरावर अनुदान मिळण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात  पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुभाष मालपाणी उपस्थित होते.

हे वाचा- प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यात सुसंवाद अत्यावश्यक.

राज्यमंत्री  बनसोडे म्हणाले की, प्लॅस्टिकचा वापर करुन विविध पूरक उद्योगधंदे सुरु करता येत असले तरी याबाबत पुरेसा अभ्यास विभागामार्फत करण्यात येईल.  मालपाणी यांनी यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांचा निधी मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मिळविणे कठीण असल्याचे नमूद केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143