fbpx
Environment Vasundhara Abhiyan'

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई Environment  – शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवित आहे. हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन लाईफ’ला पूरक असून या माध्यमातून जागतिक पातळीवरील वातावरणीय कृती आराखड्याला समर्थन दिले जात असल्याचे राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला प्राधान्य देणार

                             Environment  इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आयोजित कॉप – 27 जागतिक परिषदेत भारतीय पॅवेलियनमध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ या वातावरणीय कृती उपक्रमाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी दराडे बोलत होते. ‘लाईफ – लाईफस्टाईल फॉर एन्व्हायर्नमेंट’ ही अभियानाची यावर्षी संकल्पना आहे.

                     मागील वर्षी इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या अहवालानुसार वातावरणात होत असलेले बदल ही धोक्याची सूचना आहे. Environment  पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानातून जमीन, वायू, पाणी, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

              महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे. Environment  राज्यात पर्यावरणास अनुकूल विविधतेने नटलेले निसर्गसौंदर्य उपलब्ध आहे. Environment  ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यात वातावरणीय बदलास स्वीकारून त्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावला जात असल्याचे दराडे यांनी यावेळी सांगितले.  

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update