fbpx
hqdefault कोरोना महामारित महिला स्वयंसेवा समूहांमार्फत ३९.४६ कोटींची उलाढाल
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोविड-१९ च्या काळात महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत ३९.४६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना अधिक प्रभाविपणे राबविण्यात याव्यात, अशा सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

                   गरिबी निर्मुलनासाठी गावातील गरीब, गरजू आणि वंचित कुटुंबातील महिलांचे स्वयंसहाय्यता समूह प्रभाविपणे कार्य करीत आहेत. या माध्यमातून सामाजिक समावेशन आणि संस्थांची बांधणी होत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ४ हजार १७ ग्रामपंचायती सहभागी झाल्या असून, आगामी काळात अजून ४ हजार २२४ ग्रामपंचायती सहभागी होतील.  यासाठी प्रभावी प्रशिक्षण सुविधा देखील राबविण्यात येत आहेत.  उमेद अभियानांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये १ लाख ९६ हजार ७११ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

               विशेष म्हणजे कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंसहाय्यता गटाने चांगले काम केले आहे.  या काळात १८ हजार १४८ महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.  ८ हजार ४४४ स्वयंसहाय्यता संघांच्या माध्यमातून १ कोटी मास्कच्या निर्मितीतून ११.२६ कोटी रुपयांची, २०.३८ मॅट्रीक टन फळे विक्रीच्या माध्यमातून ४.७ कोटी रुपयांची, २० हजार ९५९ मॅट्रीक टन भाजीपाला विक्रीतून १९. ४३ कोटी रुपयांची आणि ३ हजार ७३५ मॅट्रीक टन धान्य विक्रीतून ४.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध योजनांचा आढावा

महाराष्ट्र राज्य गामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुमतीवाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, उपजीविका वृद्धीसाठी शेती व बिगरशेती आधारीत उपक्रम, महालक्ष्मी सरस, महिला किसान सशक्तीकरण परियोजना, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प, ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, कृतीसंगम अन्न, आरोग्य, पोषण व स्वच्छता अस्मिता योजना, दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांसद आदर्श ग्राम योजना अशा महत्त्वाच्या योजनांचा आढावा  घेतला. नवी मुंबई येथे सिडको भवनातील राज्य अभियान व्यवस्थापन कक्षात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी,  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान श्रीमती आर विमला, अतिरिक्त संचालक मानसी बोरकर, अवर सचिव चंद्रमणी खंदारे, उपसंचालक दादाभाऊ गुंजळ, राजेश जोगदंड, अश्विनी भोसले व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM कोरोना महामारित महिला स्वयंसेवा समूहांमार्फत ३९.४६ कोटींची उलाढाल

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update