Sports

मुंबई व ठाणे येथील क्रीडा संकुलांचा विकास करून अद्ययावत सुविधा निर्माण करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- मुंबई व ठाणे येथील क्रीडा संकुलांचा विकास करून अद्ययावत सुविधा खेळाडूंना देण्यात याव्यात, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी दिले. मुंबई व ठाणे येथील क्रीडा संकुलांच्या विकासाबाबत मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित बैठक मंत्री  केदार बोलत होते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, स्काऊट अँड गाईडचे दिल्ली येथील संचालक राजकुमार कौशिक, साई च्या निदेशक सुस्मिता ज्योत्सी यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री केदार म्हणाले, मोठ्या शहरांमध्ये  खेळाडूंना सराव करण्यासाठी शासकीय क्रीडांगण उपलब्ध आहेत. या क्रीडांगणांना विविध खेळांसाठी विकसित केल्यास खेळाडू तेथे सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन-सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतात याकरिता क्रीडा संकुलांचा विकास करणे महत्त्वाचा असल्याचा केदार यांनी सांगितले.

               महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड बाबत श्री.केदार म्हणाले, राज्यासाठी नवीन नियमावली बनवून राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी यामध्ये करावी. महाराष्ट्र स्काउट आणि गाईड ने कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन श्री.केदार यांनी केले. स्काऊट आणि गाईड यांचा उद्देश साध्य करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. या कार्यक्रमात राज्य शासनातील सर्वच यंत्रणा सहभागी होण्यासाठी निर्देशित करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले. आमदार व मंत्रीही उपक्रमांमध्ये सहभागी होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com