WhatsApp Image 2021 03 30 at 8.52.36 PM
Business Solapur City

जिल्हा समृद्ध होण्यासाठी व्हावे प्रत्येक गाव समृद्ध आ. सुभाष बापूंचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- आपले गाव संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी नेमके काय करावे आणि त्यासाठी आपल्याला राबवता येतील अशी योजना कोणत्या याचे प्रशिक्षण सरपंचांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापूर सोेशल फाऊंडेशनने तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करावी अशी सूचना आमदार मा. सुभाषबापू देशमुख यांनी काल सोलापुरात बोलताना केली.
WhatsApp Image 2021 03 30 at 8.52.37 PM
                   सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या समितीच्या कामाचे विकेन्द्रीकरण करावे, महिला सरपंचांची समिती स्वतंत्र असावी आणि युवकांना गाव पातळीवर रोजगार मिळेल असे कार्यक्रम राबवण्यावर भर द्यावा अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या. या समितीचे सदस्य असलेले फाऊंडेशनचे सल्लागार मोहन अनपट यांनी या समितीची कल्पना उपस्थित सदस्यांना समजावून दिली. उपस्थित असलेल्या सरपंचांनी तालुका स्तरावर समृद्ध गाव अभियान समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन त्यांनी केेले. समितीचे सदस्य असणार्‍या सरपंचांनी शासनाच्या योजना समजून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.
                 द. सोलापूर तालुक्यातल्या होटगीचे अतुल गायकवाड यांनी होटगी येथील साईबाबा मंदिराचे मार्केटिंग व्हावे तर गणेश पाटील यांनी गाव पातळीवर विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. संतोष दळवी यांनी जिल्हास्तरीय समितीला तांत्रिक मार्गदर्शन करणारी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी सूचना मांडली. तसेच कोणतेही काम गावकर्‍यांच्या सहभागातून घडवावे असेही आवाहन केले. बार्शीचे राहूल भड यानी प्रत्येक तालुक्यात पाच गावांची पथदर्शक म्हणून निवड करावी आणि त्यांचा विकास नियोजनपूर्वक करावा अशी कल्पना मांडली.
                नागेश कोकरे यांनी, समितीच्या सदस्यांनी गावांना भेटी द्याव्यात आणि कोणतेही काम करताना गावकर्‍यांच्या समस्या सोडवण्याला प्राध्यान्य द्यावे असे मत मांडले. या बैठकीला संचालक मयुरी वाघमारे शिवगुंडे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, अनंता चव्हाण, सोमनिंग कमळे, हरिभाऊ यादव, सचिन सुरवसे, जालिंदर बनसोडे, चिदानंद माळगे, अशोक जाधवर, तात्या गोडगे, प्रवीण कांबळे, श्रीमंत बंडगर, शहाजी देशमुख हे उपस्थित होते. मान्यवरांनी मांडलेले मुद्दे व विचारविनिमय यांना अनुसरून समृद्ध गाव उपक्रमाबाबत फाऊंडेशनची पुढील वाटचाल जोमाने होईल अशी आशा उपस्थितांनी या बैठकीत व्यक्त केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143