exam-dates-announced-ssc-and-hsc
Maharashtra

Exam : शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती 10 वी, 12 वी च्या परिक्षांच्या तारखा जाहिर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Exam – ओमिक्रोन विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाही परिक्षा होणार की नाहीत असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. या संदर्भात आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा होणार का? त्या कधी होणार याबाबत गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी 12 वी ची लेखी परिक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल यादरम्यान होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच 12 वी ची तोंडी परिक्षा, प्रेक्टिकल परिक्षा14 फेब्रवारी ते 3 मार्च या दरम्यान होणार आहे. तर इयत्ता 10 वी ची लेखी परिक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होणार आहे. तसेच 10 वी ची तोंडी परिक्षा 25 फेब्रुवारुि ते 14 मार्च या दरम्यान होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली आहे.

माजी सैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेअंतर्गत मिळकत करात सवलत

तसेच यंदा परिक्षा Exam ही आॅफलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मागील काळात ज्या पद्धतीचा पेपर असायचा त्याच पद्धतीचा पेपर यावेळी असेल. मुल्यमापनसुद्धा यामागे ज्या पद्धतीने केले जायचे त्याप्रमाणे केले जाईल असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

12 वी च्या परिक्षांच्या तारखा खालीलप्रमाणे –
लेखी परिक्षा – 4 मार्च ते 7 एप्रिल
तोंडी परिक्षा – 14 फेब ते 3 मार्च
10 वी च्या परिक्षांच्या तारखा खालीलप्रमाणे –
लेखी परिक्षा : 15 मार्च ते 18 एप्रिल
तोंडी परिक्षा : 25 फेब ते 14 मार्च

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे Exam वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

                  इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा Exam ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com