Election

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसची माळशिरस तालुका कार्यकारिणी बरखास्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

माळशिरस- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या, त्यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख नेते विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते हे भारतीय जनता पार्टीत गेले. त्यामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये माेठी पोकळी निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली. खूपच कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या नियंत्रणाखाली असावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली. दुसरीकडे शंकरराव देशमुख व उत्तमराव जानकर असे दोन गट माळशिरस तालुक्यात तयार झाले.

हे वाचा- लग्न सोहळ्यांमधील गर्दी टाळण्याचे आवाहन; गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी

                दरम्यान, प्रदेशवर असणारे शंकरराव देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील तालुका कार्यकारिणी परस्पर जाहीर केली. माणिक वाघमोडे यांना पुन्हा तालुका अध्यक्ष केले, अशी तक्रार उत्तमराव जानकर गटाने पक्षश्रेष्ठींकडे केली हाेती. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी माळशिरस तालुक्याची कार्यकारणी तातडीने बरखास्त करण्याचे अादेश जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना दिले. त्यानुसार साठे यांनी माळशिरस तालुका कार्यकारणी बरखास्त करत असल्याचे पत्र काढले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पक्षातील या घडामोडींबाबत विचारले असता, मला माहिती नाही, काय घडले आहे, याची माहिती घेतो. पक्षात माझ्यापेक्षा वरिष्ठ नेते आहेत, ते याबाबत निर्णय घेत असल्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com