fbpx
Exhibition Deputy Chief Minister

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई Exhibition –  कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी, निवडून आलेले अध्यक्ष अजय अशर, सचिव धवल अजमेरा, कोषाध्यक्ष प्रितम चिवुकुला, कन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवी, उपाध्यक्ष डॉमनिक रोमेल, पूर्वाध्यक्ष दिपक गोराडिया, मयूर शाह, नयन शाह आदी उपस्थित होते. 13 ऑक्टोबरपासून हे प्रदर्शन सुरू आहे.

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

            Exhibition   बांधकाम व्यवसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. Exhibition  मुंबई व परिसरातील आघाडीचे 100 हून अधिक विकासक या मेगा-शोमध्ये सहभागी झाले आहेत. Exhibition  घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना या मालमत्ता प्रदर्शनात एकाच छताखाली 500 हून अधिक प्रकल्पांमधून 50 हजाराहून अधिक युनिट्समध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामुळे गृह खरेदीदारांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update