expedite audit covid bills
Health Maharashtra

कोविड बिलांचे लेखापरीक्षण गतीने करण्यासाठी कार्यवाही करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर टोपे यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव निलीमा करकेटृटा, आयुक्त एन. रामास्वामी, राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, संचालक साधना तायडे आदी उपस्थित होते.

हे वाचारत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार

          जन आरोग्य अभियानाचे डॉ.अभय शुक्ला यांनी सादरीकरण केले. त्यांनी कोविडमुळे पती गमावलेल्या महिला, खासगी रुग्णालयांमध्ये आकारलेले जादा बिल, खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षणसाठी लागत असलेला वेळ अशा विविध विषयांवर मांडणी केली. त्यावर टोपे यांनी अभियानाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तपासणी केली जाईल. प्रलंबित राहिलेल्या बिलांची लेखा परीक्षण केले जाईल. त्यासाठी लेखापरीक्षकांची संख्या वाढवली जाईल, असे सांगितले. खासदार सुळे यांनी पुणे, नाशिक येथील लेखापरीक्षणाअभावी प्रलंबित असलेल्या कोविड रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील बिलांबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्याचे सांगितले. यावेळी जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143