fbpx
images 6 मुंबईत लग्न पडले महागात; आयोजकावर गुन्हा तर वधू वराला 50 हजारांचा दंड

मुंबई-  मुंबईत एका हॉलवर मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या बाबुलनाथ मंदिराजवळ असलेल्या संस्कृती हॉल मध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करुन लग्न सोहळा सुरू होता. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली असता डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्कृती हॉलवर धाड टाकली. यावेळी सदर ठिकाणी विवाह सोहळा सुरू होता आणि तेथे तब्बल 150 नागरिक उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही सर्रास उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं. यानंतर मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित सभागृहावर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सभागृह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात आली असल्याची माहिती मुंबईतील डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

                  महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन असल्याने या हॉलवर आणि विवाह सोहळा आयोजन केलेल्या नागरिकांवर मुंबई मनपाने कारवाई केली आहे. केवळ 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला नाहीयेत तर संबंधित हॉल चालक आणि लग्न सोहळ्याच्या आयोजक यांच्याविरोधात कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update