Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
जळगाव- कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटूंबांच्या ‘उभारी’ साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. यासाठी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थांनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावेत. असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी प्रशासन आहे ही भावना रुजवायची आहे. या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरु आहे. यापुढेही अधिकारी, कर्मचारी यांनी दर तीन महिन्यांना या कुटूंबांना भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवाव्यात. या उपक्रमांतर्गत वेगवेगळया पध्दतीने मदत करता येते हे जळगाव जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांनी दाखवून दिल्याचे गौरोवोद्वगारही त्यांनी यावेळी काढले.
जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. ते आगामी काळातही त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर त्या कुटूंबातील सदस्यांच्या शिक्षणानुसार त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. आयुक्त गमे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन सभागृहात जळगाव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध सामाजिक संस्थाच्यावतीन ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, बियाणे, खते, किटकनाशकांचे वितरण करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे यांचेसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143