farmer-centered-approach
Maharashtra शेतकरी

कृषी विद्यापीठाने हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेवून शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी.

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे- कृषी विद्यापीठांनी शेतकरी हिताच्यादृष्टीने एकत्रित समन्वय साधून हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेत शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी  केले. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चिमा सभागृहात आयोजित महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०५ व्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, राज्यपाल नियुक्त कृषी परिषदेचे सदस्य कृष्णा लव्हेकर, कृषी परिषदेचे अशासकीय सदस्य, मोरेश्वर वानखेडे व अर्चना पानसरे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, कृषी सहसचिव बाळासाहेब रासकर आदी उपस्थित होते.

हे वाचा- कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाचे विविध प्रयत्न

               भुसे म्हणाले, हवामान व पर्यावरण बदल तसेच शेतकरी हित लक्षात घेवून कृषी विद्यापिठाने  विभागनिहाय पीक पध्दतीत बदल करावे. जंगली प्राणी आज मोठ्याप्रमाणावर शेती पीकांचे नुकसान करत असून त्यादृष्टीने पीक पध्दतीत बदल आवश्यक आहे. यासाठी  तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून संशोधन केले पाहिजे. बदलत्या पर्यावरणाचा विचार करता विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमात बदल करणे काळाची गरज आहे. शेतकरी शेततळ्यात मत्स्यव्यवसाय करीत असून याबाबत कृषी विद्यापीठस्तर शेतकऱ्याना मार्गदर्शन करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे. कृषी विद्यापिठातील विद्यार्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय भेटीचे नियोजन करावे. एखाद्या विद्यापिठाने केलेल्या संशोधन कार्याचा उपयोग इतरही विद्यापिठांनी  करावा.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143