158197406 260051212445668 7627820773019891966 o 1
Maharashtra Solapur City

शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन साधावी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी, बचत गट, सर्वसामान्य वर्गाबरोबर शिक्षकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांत शेतकऱ्यांसाठी थेट कर्ज योजनेचाही समावेश आहे, शेतकरी बांधवांनी या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन शाखाधिकारी पी. आर. भोसले यांनी केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्यादित सोलापूर या बँकेची स्थापना ०८ मार्च १९१८ रोजी झाली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा कासेेगांवच्या वतीने १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी, दि. ०८ मार्च रोजी ‘ आर्थिक साक्षरता ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेेळी कासेगांव शाखेेचे शाखाधिकारी पी. आर. भोसले शेेेतकऱ्यांंना मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रारंभी जागतिक महिला दिवस आणि बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त ठेवीदार, कर्जदार आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन, बँकेने सुरू केलेल्या योजनांची माहिती देऊन, सर्व स्तरातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे शाखाधिकारी भोसले यांनी म्हटले.
(बाईट : पी. आर. भोसले, शाखाधिकारी)
या आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबीरात, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद माहिती देऊन शाखाधिकारी भोसले यांनी शंकाचे समाधानही केले. याप्रसंगी बँकेचे इन्स्पेक्टर एस. एम. नडगेरी, बँक क्लर्क डी. ए. चव्हाण, बँकेचे शिपाई बी.आर. राऊत यांच्याबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143