Solapur City News 39
Solapur City शेतकरी

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आ. सुभाष देशमुख यांचा महावितरणला इशारा

सोलापूर – महावितरणने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडका लावला आहे. हे अन्यायकारक आहे. कोरोना आणि लॉकडाऊच्या काळात शेतकर्‍यांना भरमसाठ मोठी वीज बिले पाठवण्यात आली आहेत. अगोदर महावितरणने ती वीज बिले दुरूस्त करून पाठवावीत. तोपर्यंत शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आ. सुभाष देशमुख यांनी महावितरणचे अधीक्षक अभियत्यांना दिला आहे. आ. देशमुख म्हणाले की, गेल्या 10 महिन्यात ज्यांनी वीज बिल भरले नाही त्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. सरकारची ही मोगलशाही आहे. अधिच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना वीज तोडणे म्हणजे शेतकर्‍यांच्या हातून पुढचा हंगामही काढून घेण्यासारखे आहे. कोरोनाच्या संकटातून आता कुठे शेतकरी सावरत आहे. असे असताना पुन्हा शेतकर्‍यांना खाईत ढकलण्याचे काम महावितरण आणि पर्यायाने सरकारने सुरू केले आहे. कोरोना काळात महावितरणने भलीमोठी वीज बिले पाठवली आहेत. ती दुरूस्त करून पाठवावीत. तोपर्यंत एकाही शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडू नये. महावितरणने जर वीज कनेक्शन तोडणे सुरूच ठेवले तर शेतकर्‍यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143