fbpx
WhatsApp Image 2020 12 18 at 7.10.55 PM अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा जीव
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला आहे. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

  WhatsApp Image 2020 12 18 at 7.46.41 PM अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा जीव                           करमाळा तालुक्यात सात डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला होता. यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग व पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि सुरू झाले मिशन बिबट्या. या ऊस फडाशेजारी वागर (जाळं) लावून वन विभागाचे गन मॅन, शार्प शूटर व पोलीस अधिकारी उसात जाऊन तपास करीत होते. त्यामुळे बिबट्याने मोर्चा शेजारील केळीच्या बागेत वळवला. येथे शार्प शूटरने फायर केले. मात्र, ते चुकवत बिबट्याने परत उसात धूम ठोकली. यानंतर वन अधिकाऱ्यांनी सर्व ऊस चारी बाजूने पेटवताच बिबट्या एका बाजूने दुसऱ्या केळीच्या बागेत निसटल्याने हे मिशन फेल झाले. सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना करमाळा आमदार संजय शिंदे हे आपले पिस्तूल घेऊन ग्रामस्थांच्या सोबत थांबले होते. मिशन फेल झाल्यानंतर बारामती येथून शार्पशूटर तावरे यांना बोलवण्यात आले होते. त्यांचे सहकारी म्हणून अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. आज अखेर याला यश आले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा जीवडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update