fbpx
Finance best service people

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आयकेएफ ग्रुपची नवीन शाखा सोलापूरात सुरू

आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आयकेएफ फायनान्स शाखेचे उद्घाटन

पंढरपूर,सांगोला,बाळे,हिप्परगे,मुळेगाव,कुंभारी,केगाव व आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांना नवी शाखा सेवा पुरवणार

सोलापूर Finance –  आयकेएफ ग्रुपने (आयकेएफ फायनान्स व आयकेएफ होम फायनान्स) गुरुवारी सोलापूर येथील आपल्या नवीन शाखेची सुरूवात केली.अनेक छोटे उद्योग आणि किरकोळ व्यापाराचे केंद्र असलेल्या सोलापूर तसेच आजूबाजूच्या परिसरातील परवडणाऱ्या घरांसाठी ही शाखा सुरू करण्यात आली आहे.सोलापूरच्या रविवार पेठेतील हरिप्रिया ऑफीस येथे आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या नव्या शाखेचे उद्घाटन झाले.यावेळी आयकेएफ फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामा राजू आणि आयकेएफ होम फायनान्सचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर्येंद्र कुमार हे उपस्थित होते.

रेल्वे वायरमनने डुब्लिकेट चावी द्वारे चोरले 28 तोळे सोने गुन्हे शाखेने केले जप्त; गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक

Finance  या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी सोलापूरचे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या,आयकेएफ ग्रुपकडे अनुभव आणि सचोटी असलेला कर्मचारीवर्ग असल्यामुळे हा ग्रुप सोलापूरच्या लोकांना सर्वोत्तम सेवा उपलब्ध करून देईल,असा मला ठाम विश्वास आहे.लवचिक कर्ज ही,खासकरून कमी सेवा उपलब्ध असलेल्या भागांसाठी, काळाची गरज आहे.सोलापूर येथील नवीन शाखा ही आयकेएफ फायनान्सची ११२ वी शाखा असून आयकेएफ होम फायनान्सची ती ५५ वी शाखा आहे.सोलापूरमधील ही शाखा आयकेएफ होम फायनान्सची १० वी शाखा असून आयकेएफ फायनान्सची २० वी शाखा आहे.

या प्रसंगी बोलताना आर्येंद्र कुमार म्हणाले,ज्यांचे स्वतःचे परवडणारे घर बांधण्याचे स्वप्न आहे,परंतु ते स्वप्न साकार करण्याचे आर्थिक सामर्थ्य नाही,अशा सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मदत करण्याचे आयकेएफ होम फायनान्समध्ये आम्ही वचन देतो. Finance  येथील प्रक्रिया सोप्या,त्रास-मुक्त आणि जलद आहेत. Finance या आयकेएफ फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामा राजू म्हणाले,एक कंपनी म्हणून आम्ही इथपर्यंतची वाटचाल केली असून हा वारसा आम्ही अभिमानाने पुढे नेत आहोत.पंढरपूर,सांगोले,बाळे,हिप्परगे,मुळेगाव,कुंभारी व केगाव या पाणलोट क्षेत्र परिसरांतील कर्मचारी आणि व्यावसायिक लोकांना प्रामुख्याने ही शाखा सेवा देईल.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update