nashik 1 750x375 1
Economy

आर्थिकदृष्ट्या बळकटीकरणासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक- जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.  मंत्री जयंत पाटील म्हणाले, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे कार्य आदर्शवत आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग हा एक प्रकारे दिशादर्शकाची भूमिका बजावत असून यासोबतच उच्चशिक्षित तरूणांना या कार्यक्षेत्रात संधी दिल्यास त्यांच्या सहभागातून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्थेची उन्नतीच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

             सद्यस्थितीतील पाण्याचे महत्त्व व भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून संस्थेने सुयोग्य पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीवाटप केले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक ‍स्थितीत सुधारणा होईल. परिणामी शेतकरी सधन होऊन संस्थाही आपोआपच समृद्ध होईल. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश्न, रस्तेबांधणी अशा सुधारणांकडे प्रभावीपणे लक्ष देवून लोकांच्या हिताचेच काम करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

             दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकरी अभियंता योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com