Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आग
पुणे : भारतातील कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. अशी प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. फक्त बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या इमारतीत चार जण अडकले असून त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा शोध सध्या सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली. कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.