Fire: Massive fire
Maharashtra

Fire : अहमदनगर शहरातील एमआयडीसीमधील सनफार्मा कंपनीत भीषण आग; एकाचा जागीच मृत्यू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

अहमदनगर Fire – शहरातील एमआयडीसीमधील सनफार्मा कंपनीत बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तसेच आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सनफार्मा कंपनीतील लोडिंग-अनलोडिंग यार्डमध्ये केमिकल सॉल्वेंटला आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन विभाग व महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.

हे वाचा – ऊस घेऊन जाणारा ट्रक उलटला; औरंगाबाद-नगर महामार्ग 3 तास ठप्प

                Fire त्यानंतर एमआयडीसी अग्निशमन विभागाचे २ व महापालिका अग्निशमन विभागाचे २ असे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचाही बंब Fire घटनास्थळी दाखल झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली. आग Fire मोठी असल्याने आग व धुराचे लोट लांबपर्यंत दिसून येत होते. आग विझवताना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एक मृतदेह आढळून आला. दरम्यान, सहा वर्षांपूर्वीही याच कंपनीत आग लागली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे काल एमआयडीसीचे पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews