मुंबई –दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची (Rain in maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून अरबी आज आणि उद्या मध्य-पूर्व अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगानं वारे वाहत आहे. पुढील काही तासांत वाऱ्याची गती आणखी वाढण्याची शक्यता असून वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इतका होण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना तातडीनं समुद्रकिनारी येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका; पुढील 4 दिवस महत्त्वाचे, पुण्यालाही इशारा हवामान खात्याने आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, घाट परिसर आदी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा 03/12/2020 सोलापूर शहर कोरोना रिपोर्ट (ग्रामीण भाग वगळून) सोलापूर शहरात 31 रुग्णांची भर #solapurcitynews जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 00 Post Views: 415
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी कल्याणकारी मंडळातर्फे रविवारी सामाजिक कार्यकर्ते सुदीप चाकोते यांना महात्मा बसवेश्वर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निस्वार्थ भावनेने समाजाचे कल्याण करण्याचा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी जगाला दाखवून दिला आहे. हाच खरा वीरशैव सिद्धांत […]
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- सोलापूरचे चांगले मार्केटिंग होऊन या शहरांमध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी, सोलापूर जिल्हा समृद्ध जिल्हा व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 2018 मध्ये करण्यात आली, सोलापूर फेस्टिवल सारखे विविध उपक्रम आयोजित करणाऱ्या […]