fbpx
van majur 750x375 1 वन मजुरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- वन मजूर व वन रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी मंडळ तयार करावे. न्यायप्रविष्ट खटले मागे घेतलेल्या पात्र वन मजूर, वन रक्षक यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे. जे वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतील त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ द्यावेत, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार हिरामण खोसकर, वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, वने विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे आणि राज्यस्तरीय वनकामगार, वनमजूर, वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                  राज्यमंत्री भरणे म्हणाले, जे वन मजूर १९९४ पासून काम करीत आहेत, अशा मजुरांना नियमाप्रमाणे कायम सेवेत रूजू करून घेण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. ज्या वनमजुरांची वयोमानानुसार सेवा संपुष्टात येत आहे त्यांनाही नियमाप्रमाणे सेवानिवृत्तीसाठी असलेले लाभ द्यावेत. वनमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ तयार करण्यात यावे जेणेकरून त्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होतील. या वनमजुरांवर अन्याय होऊ नये त्यांना सहकार्य कसे करता येईल यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावे. ज्या वनअधिकाऱ्यांवर गैरकारभाराचे आरोप झाले आहेत. त्यांची चौकशी करण्यासंदर्भात समिती गठित करून चौकशी करण्याचे निर्देशही राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी दिले. पात्र असलेल्या वनमजुरांनी शर्तीनुसार न्यायालयातील प्रकरणे मागे घ्यावीत जेणेकरून त्यांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल असेही वनमजूर संघटनेच्या प्रतिनिधींना राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n वन मजुरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्याडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update