Covid 19 Health

यंत्रमाग कामगारांकरीता मोफत अँटीजेन टेस्ट संपन्न- आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने आयोजित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरीता रविवार, दि. 18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरीता सोलापूर यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी., सोलापूर येथे मोफत अँटीजेन टेस्ट शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

             यामध्ये सोलापूरातील सर्व यंत्रमाग कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील सर्व कामगारांचे कोव्हिड-19 अँटीजेन टेस्ट करून घेतले. यामुळे सदर कामगारांना यंत्रमाग कारखान्यामध्ये काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. या शिबीरामुळे सोलापूरातील शेकडो गोर-गरीब यंत्रमाग कामगारांना अत्यंत मोलाची मदत झाली असल्याने अनेकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आधार मानले.

यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे पेंटप्पा गड्डम, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे  श्रीधर बोल्ली, निलेश फोफलिया, रमेश ढाकलिया, सुधाकर गुंडेली, अमर देवसानी, विकास गड्डम,  सुरेश नक्का, लक्ष्मीनारायण दासरी, लक्ष्मीकांत साका, नागेश बोमड्याल, तिरुपती परकीपंडला, ओंकार अडगटला, सन्नी मडूर,  विजयकुमार हलकट्टी, सिध्दू अल्ली, अशोक वडनाल, भूषण येलें, राजय्या गज्जम, आदि. बहुसंख्य कारखानदार व कामगार उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com