Health Solapur City

रात्री मोफत रिक्षा पाहिजे का; सक्षम सामाजिक संस्थेच्यावतीने मोफत रात्र रिक्षा सेवा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – पृथ्वी वर कोसळलेल आस्मानी संकट म्हणजे कोरोना अश्या परिस्थिती मध्ये शेळगी व मित्रनगर परिसरातील रुग्णाना दवाखान्या मध्ये नेण्याकरिता महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने रात्री १० ते पहाटे ०५ च्या दरम्यान मोफत रिक्षा ची सोय करण्यात आली असून या करीता शेळगी भागातील नागरिकांनी ७३८५७४०६५१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हाहन सक्षम संस्थे चे संस्थापक प्रशांत हिबारे यांनी केले.

            काळाची गरज ओळखून सक्षम ने चालू केलेला हा उपक्रम लोकोपयोगी असून अश्या उपक्रमाची गरज असल्याचे नमूद करत सक्षम च्या कार्याचा कौतुक करीत पोलीस उपनिरीक्षक नागेश मात्रे यांनी पोलीस दलाकडून संस्थेला शुभेच्छा दिल्या. उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमास नगरसेवक डॉ. किरण देशमुख, एस के बिराजदार शाळेचे मुख्याध्यापक वांगीकर, रुग्ण सेवक रुपेशकुमार भोसले, ज्ञानेश्वर कारभारी, सचिन हुंडेकरी,प्रशांत हिबारे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळासाहेब भेंकी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद खोबरे यांनी केले. सदर सेवेसाठी संस्थेचे सचिन शिंदे, बुद्धरक्षित गायकवाड, अनिकेत मडखंबे, प्रदीप शिंदे, विठ्ठल शिंदे, सिद्धार्थ कांबळे आदींनी परिश्रम घेतले

रुग्ण सेवा हे मानवी कर्त्यव म्हणून सेवा पुरविणार
संचार बंदी च्या काळामध्ये रुग्णांना रात्री काही त्रास झाल्यास वेळेवर उपचार मिळावा या हेतूने रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहचविण्याकरीता हि सेवा उपलब्द करून देत आहोत असे प्रतिपादन सचिन हुंडेकरी यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com