fbpx
images 4

मुंबई-  कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. आता 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, राज्यात लशी तुटवडा असल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावर भाष्य करण्याचे टाळले असून ‘उद्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या  बैठकीत लसीकरणावर निर्णय घेतला जाईल’, असं उत्तर दिले आहे. राज्यात 1 तारखेपासून लसीकरण कशा पद्धतीने होणार याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाची लसीकरण कसे होणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. पत्रकारांनी अजित पवार यांनाबद्दल विचारले असता ते म्हणाले की,’उद्या कॅबिनेटमध्ये लसीकरणावर अंतिम निर्णय होईल, मी आताच काही मत व्यक्त करणार नाही. लशीचा तुटवडा राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आहे. ऑक्सिजन, रेमडेसीवीर आणि लशीवर आता केंद्राचा कंट्रोल आहे. त्यामुळे देशाच्या प्रमुखांना सांगितलं की त्यावर योग्य निर्णय घेतला जात आहे’

          ‘मोफत लस द्यावी याबद्दल सर्वांची आग्रही मागणी आहे. त्याबद्दल सर्वांना बोलायचा अधिकार आहे, प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करू शकतो. पण, याबद्दल योग्य तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर करतील, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. ‘रेमडेसीवीर इंजेक्शन वाटपाबद्दल सुजय विखे पाटील यांचे फोटो व्हायरल झाले. विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या लोकांनी याचा अतिरेक करू नये.’ असा टोलाही अजित पवारांनी विखेंना लगावला. ‘देशातल्या जनतेचं लसीकरण करण्याचं काम केंद्राने केले पाहिजे पण अद्याप लसीकरणावर केंद्राची भूमिका स्पष्ट नाही’ असा टोलाही पवारांनी केंद्राला लगावला.

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update