Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
राष्ट्रतेज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग ३ (अ)येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते भव्य रस्ता कामाचं शुभारंभ
सोलापूर Fund – राष्ट्रध्वज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक ३ येथील एनटीआर भजी सेंटर ते पठाण बाबा दर्गा वासू टेलर ते बनसोडे घर रस्ता डांबरीकरण व फूटपाथ करण करणे तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर महाराष्ट्र शासन अनुदानातील 25 लक्ष रुपयांचा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते भाजपाचे युवा नेते मनीष देशमुख, भाजपाचे सरचिटणीस बिजू प्रधाने शशिकांत थोरात राजशेखर उर्फ बाळू पाटील अशोक कटके समीर पांगळे जगन्नाथ बनसोडे सिद्राम तेगेळ्ळी,जे.डी. कांबळे निंगप्पा पुजारी,गोविंद सोनी, महेश नांदगावकर, अक्षय अंजीखाने, सागर मोरे आनंद साळुंखे विजय पुजारी, नरसप्पा मदगल, बंडप्पा डोळे, बसवराज जाडगल, आदींच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी करण्यात आले. प्रारंभी भाजपाचे माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ आणि कैलास वासी प्रकाश मारता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुण्याला जाताना या नियमावली जाणून घ्या अन्यथा…
Fund प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कुठलेही राजकारण न करता महापालिकेतून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला गेल्या पंचवीस वर्षांपासून या भागाचं आपण नेतृत्व करीत आहे मतदारांच्या आशीर्वादानेचं शक्य झाले आहे. प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो असे यावेळी प्रास्ताविकात भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले. सुरेश पाटलां सारख्या विकासाभिमुख नेतृत्व Fund या भागातील नागरिकांना मिळाले आहे सुरेश पाटलांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडविणे मध्ये नेहमी अग्रेसर असतात असे मनोगत यावेळी युवा नेते मनीष देशमुख यांनी व्यक्त केले. गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजेच पाच टर्म महापालिकेमध्ये तसेच जनतेच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण केलात जनतेच्या विश्वासाला आपण पात्र ठरला टीका-टिप्पणी जास्त महत्त्व देऊ नका शेवटच्या श्वासापर्यंत आपले कार्य अविरत सुरू ठेवा सुरेश पाटलांच्या नेतृत्व आणि कार्यक्षमतेवर मतदारांचा विश्वास आहे सर्वसामान्य व तळागाळातील भाजपचे कार्यकर्ते हेचं भाजपाचे मालक आहेत प्रभागातील नागरिकांनी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या पाठीशी अखेरच्या श्वासापर्यंत खंबीर उभे राहावे असे आव्हान व मनोगत यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला.. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपाचे युवा नेते मनिष देशमुख यांच्या हस्ते या विकास कामांचा विधीवत पूजनाने शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे बिपीन पाटील यांनी आभार मानले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews