Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Fund – मराठा तरुणांना नवनवीन उद्योगांसाठी कर्ज तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देवून मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जातात. नवीन तरुण उद्योजक घडावेत, यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतील प्रलंबित कर्जप्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, अशा सूचना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्ह्यातील कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव, लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.

Fund अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, शेतकरी कुटुंबातील मराठा तरुणांना नवनवीन उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. जो उद्योग सुरु करावयाचा आहे, त्या उद्योगाचे शासनमान्य संस्थेतून प्रशिक्षण घेवून लाभार्थींनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत. तसेच, लाभार्थींनी कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचा अहवाल चांगला कसा राहील, याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील तरुणांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करावी. तसेच प्रशिक्षण संस्थेने तालुका स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करावे. आवश्यक ठिकाणी योजनेच्या माहितीचे फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यात सध्या 5 हजार लाभार्थी असून, जिल्ह्यातील जास्तीत – जास्त तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील योजनेचा लाभ मिळावा तसेच त्यांना याबाबत कोणतीही अडचण येवू नये यासाठी उपविभागीय स्तरावर कार्यालये सुरु करावेत. महिलांसाठी कर्जसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर बँक कर्मचारी, लाभार्थी आणि महामंडळ यांचा संयुक्त मेळावा आयोजन करण्यात येणार आहे. Fund लाभार्थीची वयोमर्यादा १८ ते ६० आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही यावेळी अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. Fund यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांच्या अडचणी जाणून घेतल्या व संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील योजनेतील प्रकरणे प्रलंबित राहू नयेत. सदर प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी यावेळी सांगितले.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143