Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
माळशिरस Fund – माळशिरस तालुक्याच्या तहसील कार्यालयावर मातंग संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.देश स्वतंत्र झाल्यापासून पहिलाच मातंग समाजाचा विराट मोर्चा माळशिरस तहसील कार्यालयावर काढण्यात आला.सदर मोर्चाचे निवेदन तहसीलदार जगदीश निंबाळकर,पंचायत समितीचे ओ एस कदम,समाजकल्याण विभागाचे समता दूत किरण वाघमारे,यांनी स्वीकारले.
Fund माळशिरस तालुक्यातील मातंग समाजातील घरकुल लाभार्थी यांना घरकुलापासून वंचित ठेवण्यात आलेल्या कुटुंबाला तात्काळ लाभा देण्यात यावा. जागेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याठिकाणी शासनाच्या ताब्यातील जागा व सध्याच्या स्थितीमध्ये ज्या कुटुंबाला ग्रामपंचायतथा ८ अ मालकी हक्काचा आहे त्यांना वंचित न ठेवता तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा. निर्णय पारित करावा, संगमवाडी, पुणे येथील क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम तात्काळ चालू करावे,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष नेमूण तीन वार्षाचा आर्थिक अनुशेष देऊन महामंडळ त्वरित चालू करावे,
शाळा चालू झाल्यानंतर तात्काळ शासकीय वसतिगृह चालू करावे.
हे वाचा – आनंदाची बातमी! या विभागात 1013 क्लार्क पदांची भरती
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज Fund अभ्यास आयोगाने लागू केलेल्या सर्व शिफारशीनुसार संबंधीत विभागाने शासन निर्णण निर्गमीत करावे.अनुसूचित जाती समूहाचे अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करून मातंग समाजाल स्वतंत्र्य आरक्षण देण्यात यावे असा राज्य शासनाने कायदा करावा. बाटींच्या धर्तीवर आर्टी संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने त्वरीत करावी. Fund क्रतिबीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती दि. १४ नोव्हेंबर या दिवशी शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करणेबाबत शासन निर्णय पारित करावा,क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगास शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम तत्काळ चालू करावे.पुर्ववत करावे. मातंग समाजाच्या व्यक्तीचा खून झालेल्या प्रकरणातील आत्याचारित पिडीत कुटुंबाचे जमीन,पेंशन व नोकरी देऊन पुनवर्सन करावे,माळशिरस तालुक्यात पडिक शासकीय जमीनी मातंग समाजातील भूमीहीन शेतमजुर, जनसमूहाला २ हेक्टर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला वाटप करावी माळशिरस तालुक्यातील मातंग वस्त्यामध्ये जेथे समाज मंदीर उपलब्ध नाही त्याठिकाणी जागेसहीत उपलब्ध करून द्यावेत.माळशिरस तालुक्यातील मागासवर्गीय मातंग कुटुंबाला निवासी प्रयोग जनासाठी गावठाण व गावरानातील जागा तात्काळ वाटप कराव्या. सदर मागण्या शासनाने मान्य न केल्यास तीन महिन्यानंतर मुंबई येथील आझाद मैदानावरती बेमुदत महाधरणे आंदोलन करण्याचा इशारा मातंग संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.मातंग संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील मातंग समाज विराट संख्येने सहभागी झाला होता.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews