Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Gajanan Maharaj- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज रूपा भवानी मंदिर येथे आज श्री गजानन महाराज शेगांव संस्थान पालखीचे आगमन झाल्यावर महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त मा. विजय खोराटे यांनी सपत्नीक पालखीचे पूजन करून सोलापूर शहरात स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने,पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर,नगर अभियंता संदीप कारंजे,अग्निशमन दल अधिकारी केदार आवटे, माजी नगरसेविका निर्मला तांबे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, झोन अधिकारी किशोर सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
सालाबादाप्रमाणे आषाढवारी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री गजानन महाराज Gajanan Maharaj शेगांव संस्थान पालखी मिरवणूक आज सोलापूर शहरात आगमन झाले असून सदर पालखी सोलापूर शहरात दोन दिवस मुक्कामास आहे दिनांक 05.07.2022 वार मंगळवार रोजी तिर्हे मार्गे पंढरपुरास जाणार असून मिरवणुकीत 750 वारकरी सह, वाहन, वादय, घोडे बँड पथकासह पालखी पालखी पुढे मार्गस्थ होते. आज रूपा भवानी येथील पाणी गिरणी येथे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गजानन महाराज शेगाव संस्थांची पालखीची पूजा महापालिकेच्या वतीने करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ही पूजा करण्यात आली. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे टँकर तसेच फिरते स्वच्छालय आणि मुक्कामाचे ठिकाणी लाईट, मंडप विविध व्यवस्था महापालिकेचे वतीने करण्यात आले आहे.

#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143