ganeshotsav-should-celebrated
Maharashtra Religious

तिसऱ्या लाटेचे भान ठेवा ; कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव व्हावा साजरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक- गणेशोत्सव साजरा करताना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आणि तिसऱ्या लाटेचे भान ठेवूनच जनजीवन सुरू राहावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

                     जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी बैठकीस उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सव काळात महानगरपालिका व पोलीस यंत्रणांकडून आवश्यक सर्व परवानगी घेणे गरजेचे आहे या यंत्रणांनी देखील सुलभ पद्धतीने परवानगी देणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरीता नागरिकांनी सुध्दा गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले. जिल्ह्यात प्रस्तावित असणाऱ्या 24 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत प्रकल्पांचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

रेमडेसिव्हीर  टॉसीलीझुमॅब मेडिकलमधून थेट वितरण :

टॉसीलीझुमॅब व रेमडेसिव्हीर या औषधांचे सुरूवातीला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात येत होते. परंतू आता टॉसीलीझुमॅब व रेमडेसिव्हीर ही औषधे थेट डॉक्टरांच्या सल्ल्याने थेट मेडिकलमध्ये वितरणासाठी उपलब्ध आहेत. ही औषधे माफक दरात नागरिकांना उपलब्ध होत असल्याची खात्री अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी एका दिवसात एक लाख लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रशासनामार्फत आवश्यक पूर्व तयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले. बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143