Fund Maharashtra

रमाई घरकुल योजनेच्या मंजूर निधीचा तपशील तातडीने पाठवा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई – रमाई घरकुल निर्माण समितीअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून याबाबतचा विस्तृत तपशील तातडीने पाठविण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. लातूर जिल्हा रमाई घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  समाज कल्याण अधिकारी, रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री  देशमुख म्हणाले, राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावण्याबरोबर त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या‍ ठिकाणी शासनामार्फत पक्के घर बांधून देण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रात निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड करुन घरकुल  निर्माण समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत मंजूर कामांसाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावाही करण्यात येणार असल्याचे  देशमुख यांनी सागितले. या बैठकीत सन  2019-20 या वर्षातील शिल्लक उद्दिष्टानुसार 2915 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली तसेच सन 2020-21 मधील 6827 उद्दिष्टापैकी 1645 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सन 2020-21 मधील उर्वरित उद्दिष्टांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना अमित देशमुख यांनी दिल्या तसेच शहरी भागासाठी प्रलंबित असलेल्या 27 कोटी रुपये अपेक्षित निधीचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com