Economy

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने चांदीच्या किंमती वाढल्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली- आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बाजारातील तेजीमुळं सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. नवी दिल्लीमधील सराफा बाजारात सोने दरात  मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळाली. नवी दिल्ली सराफा बाजारात सोने 881 रुपयांनी महागले. दिल्लीमध्ये सोने प्रतितोळा 44,701 रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वीचा सोन्याचा एका तोळ्याचा दर 43,820 रुपये इतका होता.

            चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात चांदी 1071 रुपयांनी महागली. चांदीचा एक किलोचा दर 63256 रुपये एवढा झाला. यापूर्वीचा चांदीचा दर 62,185 रुपये इतका होता. एजडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी एक्सपर्ट तपन पटेल यांनी जागतिक मार्केटमधील तेजीचा परिणाम सोने चांदीच्या दरावंर झाल्याचं म्हटलं. येत्या काही दिवसांत चांगला परतावा मिळेल

वर्षाच्या अखेरीस सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता

गुंतवणुकीसाठी सोने नेहमीच चांगला पर्याय ठरला आहे. असे सांगितले जात आहे की, पुन्हा सोन्याच्या किमती गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न देऊ शकतात. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधन अहवालानुसार, सध्या सोनं चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीनं उच्च विक्रम नोंदविला आहे. परंतु या क्षणी सोने ऑगस्टपासूनच्या विक्रमी उच्चांकडून सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. 2021च्या शेवटी सोन्यामध्ये पुन्हा वाढ दिसून येईल. दीर्घ कालावधीत सोने नेहमीच चांगले उत्पन्न देते. 5 मार्च रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 43,887 रुपये होते. त्यानंतर सोन्याची किंमत सुमारे 950 रुपयांनी महाग झाली. तज्ज्ञांच्या मते लग्नाचा हंगाम जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी मागणी वाढू लागली. काही महिन्यांनंतर सोन्यात अधिक तेजी येऊ शकते. वर्षाअखेरीस सोने 48 हजारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143