fbpx
Open Gym inauguration Islampur 750x375 1 इस्लामपूर नागरिकांसाठी ओपन जिमच्या माध्यमातून चांगली सुविधा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली- पोलीस परेड ग्राऊंड इस्लामपूर येथील मैदानावर जायंटस् ग्रुप ऑफ इस्लामपूर व माणुसकीचं नातं यांनी एकत्र येत ओपन जिमची सुविधा निर्माण केली आहे. इस्लामपूर नागरिकांसाठी ही नवी व अतिशय चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पोलीस परेड ग्राऊंड इस्लामपूर येथील मैदानावर उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे लोर्कापण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, जायंटस्  ग्रुप चे दुष्यंत राजमाने, रणजित जाधव, ॲड. श्रीकांत पाटील, उद्योजक गिरीष चितळे, सर्जेराव यादव, डॉ. राजकुमार पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

                         पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जायंटस् ग्रुप, माणुसकीचं नातं यांनी अतिशय कल्पकतेने ओपन जिमची सुविधा निर्माण केली आहे. कोरोनाच्या अनुषंगानेही त्यांनी अनेक कामे केली आहेत. अनेक गरजूंना मदत करीत आहेत. पोलीस दलानेही कोरोना काळात अतिशय चांगले काम केले असून कर्तव्याच्या बाहेर जाऊन माणुसकी दाखविण्याचे काम केले आहे. सामान्य माणसाला त्रास होऊ नये त्यांना मनमोकळेपणाने जगता यावे यासाठीही पोलीस दल चांगले काम करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, दुष्यंत राजमाने, गिरीष चितळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले. स्वागत रणजीत जाधव यांनी केले. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील  यांनी इस्लामपूर येथील महादेवनगर व कापुसखेड रोड येथील घरकुलांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी  त्यांनी नागरिकांच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, रेशनकार्ड आदींबाबत समस्या जाणून घेऊन संबंधितांना त्या सोडविण्यासाठी निर्देश दिले. यावेळी तहसिलदार रविंद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n इस्लामपूर नागरिकांसाठी ओपन जिमच्या माध्यमातून चांगली सुविधाडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update