Covid 19 Solapur City

मानसिक व शरीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवा; खा. महास्वामी यांची कोविड सेंटरला भेट

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- विजापूर रोडवरील केटरिंग कॉलेज येथील कोविड केअर सेंटर ला खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
               सध्या केटरिंग कॉलेज येथील कोविड केअर सेंटर येथे 60 रुग्ण दाखल आहेत. उत्तम व्यवस्था केल्याने रुग्ण समाधानी असल्याचे पहावयास मिळाले. मानसिक व शरीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवत रुग्णांनी नेहमी सकारात्मक विचार करावा. उपस्थित रुग्णांना उत्तम मनोबल ठेवण्याचे मार्गदर्शन खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी केले. खा. महास्वामी यांनी रुग्णांच्या संख्येतील आकडेवारी घेत सध्या लक्षणे आढळणारे रूग्णसंख्येत घट होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी लक्षणे आढळल्यास वेळ वाया न घालविता तात्काळ तपासणी करीत विलागुकरन कक्षात दाखल व्हावे. त्यामुळे पुढे वाढणारा धोका कमी होईल. गांभीर्याने घेत लक्षणे आढळताच उपचार केल्यास आजार निश्चित बरा होतो असेही खा.डॉ. महास्वामी यांनी सांगितले.

            यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार अमोल कुंभार, गट विकास अधिकारी राहुल देसाई, डॉकटर, परिचारिका इतर कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com