fbpx
government-ceremony-republic-day

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Republic Day- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झाली. राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदन यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग उपस्थित होते.

12 दिवस फेब्रुवारीमध्ये बँका बंद राहणार

             या कार्यक्रमात गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक तसेच बृहन्मुंबई अश्वदलाने राष्ट्रध्वजाला Republic Day सलामी दिली. मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल हे संचलन प्रमुख होते. यावेळी सन 2020 साली झालेल्या प्रजासत्ताक दिन Republic Day संचलनात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अनुपकुमार सिंग यांच्या हस्ते प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. शासकीय सेवेतील सहभागी पथकांमध्ये गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी 60 पथकाला प्रथम, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाला द्वितीय तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. शालेय सहभागी पथकांमध्ये आरसीपी (मुली) रूस्तमजी इंटरनॅशनल स्कुल, दहिसर (पश्चिम) यांना प्रथम तर आरएसपी (मुले) सेंट पॉल्स कॉन्व्हेंट हायस्कूल, दादर (पूर्व) यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update