fbpx
27.12.2020 Palakmantri Cheque Vitran To Z. P. Employee Covid 19 Victim Family 1 750x375 1 कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर-कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला. राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सानुग्रह धनादेश कुटुंबियांना देण्यात आला. कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनसह विविध निर्बंध असताना शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे कर्मचारी गावागावांमध्ये झटत होते. यापैकीच नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, तसेच हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डिगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले.

                 महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू केले होते. यामध्ये ग्रामविकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी यांच्यासाठी 50 लाख रुपयांचे विमा कवच निर्धारित करण्यात आले होते. शासनाच्या 8 सप्टेंबरच्या आदेशानुसार सातारा, भंडारा, अहमदनगर, पुणे, ठाणे, रायगड, सांगली, जळगाव, कोल्हापूर, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील 17 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या या धोरणामुळे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा विमा कवच सतत सानुग्रह सहाय्य मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे वारस श्रीमती अर्चना कुहिटे, श्रीमती आशिया मस्जिद शेख यांना आज सानुग्रह निधीचा धनादेश देण्यात आला. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी या कुटुंबाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेंद्र भुयार व अन्य कर्मचारी उपस्थित होते. #solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update