Solapur City

मराठा आणि ओबीसी मध्ये सरकारच भांडण लावत आहे – नरेंद्र पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर प्रतिनिधी-  मराठा आणि ओबीसी या दोन जाती मध्ये भांडण लावण्याचे काम सध्याचे विद्यमान सरकार करत असल्याचा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केला आहे.  पाटील हे सोलापूर मध्ये आले असता शासकीय विश्रामगृहावरती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दास शेळके, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, आनंत जाधव,सकल मराठा समाजाचे माऊली पवार, किरण पवार, आदीसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की.मराठा समाजाला आर्थिक सवलती देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना मागील सरकारने केली होती. मराठा तरुणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज वाटप, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सुविधा देण्यात आली होती. परंतु नवीन सरकारच्या माध्यमातून या सवलती मध्ये फरक पडला आहे. आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही अपरिचित गोष्टी घडल्या .यामध्ये सारथी संघटनेचे कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आलं महामंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरी आठ कोटी रुपये दिले असले तरी ते पैसे अजून मिळालेले नाहीत. प्रत्यक्षामध्ये एकाही मुलाला सारथी मधून सध्या अनुदान मिळत नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एकही रुपया आघाडी सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत मिळालेला नाही. आघाडी सरकारच्या माध्यमातून वसतिगृहाची नवी निर्मिती झाली नाही. मराठा समाजाचे मुलं आणि मुली यांच्यासाठी मागच्या सरकारने जे निर्णय घेतले, त्या निर्णयांमध्ये अजून कशी वाढ करता येईल यासाठी काहीही प्रयत्न सध्याचे सरकार करत नाही. मराठा आरक्षणासाठी ज्या मंत्र्यांची किंवा आमदारांची नेमणूक झाली त्यांनी कधी योग्य पाठपुरावा केला नाही .9 सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेले वकील योग्य वेळी न येता उशिरा असल्यामुळे ईसीबीसी मधून जाहीर झालेल्या 12 आणि 13 टक्के आरक्षणला स्थगिती मिळाली. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वर्ग झाले.समाजातील तरुणांनी एमपीएससी परीक्षा दिल्या होत्या. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये नोकर भरती साठी परीक्षा दिल्या होत्या. त्या सगळ्या स्थगित करण्यात आल्या आहेत. पोलिस भरतीमध्ये 10 ते 12 हजार भरत्या करणार होते .त्यामध्ये मराठा समाजातील तरुणांना प्राधान्य मिळणार नाही. राज्य सरकार कुठेतरी मराठा समाजाच्या विरोधात आहे का? अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी निर्माण होऊ लागलेला आहे असा आरोपही त्यांनी सध्याच्या आघाडी सरकारने केला आहे.
मराठा आरक्षणासाठी जे एकत्र लढले होते ,ते मराठा समाजातील विविध पक्षाचे नेते क्रांती मोर्चा ,ठोक मोर्चा, सकल मराठा या सर्वांना एकत्र आणून चर्चा करण्यासाठी आपण सोलापुरात आल्याचे त्यांनी सांगितले.मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संघटना निर्माण केली. ज्या पद्धतीने बारर्टी संघटना होती. तशीच सारथी संघटना. मराठा आणि कुणबी या समाजाला त्या ठिकाणी शैक्षणिक लोन मिळत होते, आता तिथं काही गफलत झाली, काय झाले, परमेश्वरालाच माहित. परंतु सरकारने ही संस्था पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या सारथी मध्ये फक्त दोन ते तीन अधिकारी लोक राहिले आहेत. बाकी सगळेच तारादूत काढून टाकले. या सरकारच्या काळातील ही पहिली घटना घडली आहे. याबाबत अजित पवारांना वेळोवेळी आम्ही सांगितले. मराठा समाजाचे छत्रपती संभाजी राजेंना ही सांगितलं परंतु प्रत्यक्षामध्ये प्रश्न सुटला नाही.अजुन ही तारादूतांचे आझाद मैदान वरती उपोषण चालू आहे. याचा अर्थ असा की सारथी ही संघटना बंद करायची सरकारने ठरवलेली आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मधून तेराशे कोटींचे कर्जवाटप झाले. वीस हजार मराठा बांधव त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहेत.जर महामंडळाला राज्य सरकारने पैसे दिले नाही तर महामंडळ व्याज परतावा कसे देईल? बँकेतून कर्ज घेतलेले मराठा तरुण यामुळे अडचणी मध्ये येऊ शकतात. सुप्रीम कोर्टामध्ये केस लढतात त्याचे जे वकील आहेत ते हजर राहत नाहीत हे कधीतरी उशिरा जातात .युक्तिवाद करत नाहीत. हे राज्यातले मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी विविध चैनल वरती बोलून दाखवलेले आहे . सध्याचे आघाडी सरकार मराठा समाजावर ती पुनश्च एकदा अन्याय करत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र मराठा समाज अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा समाज आहे सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143