Crime Solapur City

मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – सहा. पो. नि. राजेंद्र सदाशिव सावंत्रे यांना त्याच्या कार्यालयातच शिवीगाळ व धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश दिगंबर गुरव याची सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती आर. डी. खेडेकर यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की, दिनांक २२/०८/२०१३ रोजी संध्याकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी स.पो.नि. राजेंद्र सावंत्रे हे सोलापूर शहर बॉम्ब शोध व नाश पथकाच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना पो.कॉ. गणेश गुरव हे त्यांच्या कर्तव्यावर उशिरा व दारू पिऊन आले होते. त्याबाबत गुरव यांना विचारणी केली असता गुरव यांनी सावंत्रे यांना शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करीत जमिनीवर पाडले आणि जखमी केले त्यावेळी तेथील इतर पोलिसांनी सावंत्रे यांना सोडविले. त्यावेळी इतर पोलिसांनाही गुरव याने शिवीगाळ व धमकी दिली वगैरे आशयाची फिर्याद स.पो.नि. राजेंद्र सावंत्रे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिल्यावरून पो.नि. दिलीप उडते यांनी गुन्ह्याचा तपास केला.आरोपी गुरव हा फिर्यादी सावंत्रे यांना भ्रष्टाचारात सहकार्य करीत नसल्यामुळे चिडून आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड.अरविंद अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी गणेश गुरव यांची निर्दोष मुक्तता केली. पोलीस खात्यात गाजलेल्या ह्या खटल्यात आरोपी तर्फे अॅड.अरविंद अंदोरे,अॅड.आल्हाद अंदोरे,अॅड.रवी गजधाने,अॅड. स्नेहा पुळूजकर,अॅड.महेश लालसरे,अॅड.रजनी बोमेन,अॅड.दत्तात्रय कापूरे यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे अॅड.प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143