Crime Maharashtra

शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध कारवाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई – खोटी बिलं देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे. मे.लॅव्हिश एन्टरप्राइजेस आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे प्रकरण पुढील तपासासाठी राज्य कर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. सदर प्रकरणात दिनांक २२  डिसेंबर २०२० रोजी अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, करदाता मे.लॅव्हिश एन्टरप्राईजेसचे मालक  प्रकाश कुमार वीरवाल आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे मालक श्री.प्रभुलाल तेली व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि सदर जागेवर ते कोणताही व्यवसाय करीत नाहीत एक वर्षापासून सदर कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन करून वस्तुंच्या पुरवठ्याशिवाय रूपये ४२८ कोटी रूपयांची बनावट बीले देऊन आणि रू.७९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम-२०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बीजक किंवा बिल जारी  करून शासनाची महसूल हानी केली आहे. सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने  दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली असून माननीय न्यायालयाने सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सूरजसींग यांनी अशाच अनेक बनावट कंपन्या नोंदणी केल्याचा संशय असून शासनाच्या करोडो रूपयांची महसूल हानी केल्याचा संशय  महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत  सहायक आयुक्त नंदकुमार दिघे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपआयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या तपासासाठी अन्वेषण-अ चे सहआयुक्त ई.रविंन्द्रन यांचे मार्गदर्शन लाभले आहे, असे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून  प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143