Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द काढून तमाम भारतातील सर्व लोकांचा तसेच शिवप्रेमी यांचा अपमान केलेले आहे ते भारतातील नागरिक कदापिही सहन करणार नाही , वारंवार महापुरुषांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या वाचाळवीर राज्यपाल यांना मोदी सरकारने तातडीने दिल्लीला परत बोलवावे अन्यथा येत्या 8 दिवसात महाराष्ट्रातील तमाम जनतेला सोबत घेऊन राज्यपाल कोश्यारी यांचा राजभवन येथे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिला आहे.
सोलापूर-प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारीचा निषेध केला. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यात सर्वत्र राज्यपालांचा निषेध केला जात आहे.आज प्रहारने देखील सोलापूर शहरातील सात रस्ता चौक येथे राज्यपालांचा निषेध करत प्रतिकात्मक रित्या गाढवा वरून धिंड काढली.तमाम महाराष्ट्रातील जनता जर शिवाजी महाराजांचे मावळे असतील तर , मावळे म्हणून आवाहन करण्यात आले की,येत्या 8 दिवसात राजभवनावर जमा होऊन राज्यपालांचा निषेध करा असे आवाहन प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. या.वेळी प्रहार जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील आणि जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी कडक शब्दात राज्यपाल भगतसिंग यांचा निषेध.केला… या प्रसंगी जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख, शहर कार्यकारी प्रमुख खालिद मणियार, मंगळवेढा तालुका प्रमुख राजकुमार स्वामी, जिल्हा उपप्रमुख युनूस पठाण , माजीद पटेल, समर्थ गुंड आदी उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
****अधिक माहितीसाठी संपर्क ***
सुनिल कोडगी, संपादक
9503221143 / 9404151143