Crime National

बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ. सुभाष देशमुख यांची टीका

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेवर राज्यातील नेते मूग गिळून गप्प बसले असल्याची टीका आ. सुभाष देशमुख यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांना वाघीण म्हणणारे नेते आता हिंसाचारावर का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी केला आहे.
                निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय आहेत. बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी भाजपचे काम केले आहे त्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याचे प्रकार बंगालमध्ये घडत आहे. निवडणुकीपूर्वीही भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर असेच हल्ले झाले आहेत त्यात आणि त्यांनी आपले प्राण गमावले आहेत. बंगालमध्ये एक प्रकारे ममता बॅनर्जी यांचा गुंडाराज सुरू आहे. हे थांबले पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा. निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय आहे. याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे बंगालच्या विजयानंतर राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना वाघीण असे संबोधले आता तेच नेते या हिंसाचाराबद्दल मूग गिळून गप्प का आहेत, असा कोल्हे आ. देशमुख यांनी केला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com