fbpx
Solapur City News 19 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोलापूरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. प्रमुख उपस्थितीतांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, सभागृह नेता शिवानंद पाटील, नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, भाजपा शहर सरचिटणीस शशी थोरात, संजय कणके, परिवहन सदस्य पिंटू महाले आदींच्या उपस्थित या शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील यांनी बोलताना म्हणले की, राजकारण, समाजकारण आणि धर्मपरायण या क्षेत्रात परमोच्च शिख गाठणार्‍या तसेच शुद्धचारित्र्य सात्विक आचारविचार व चोख कारभार यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून लौकीक संपादन केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या या लौकीकाबद्द्लच पुण्यश्लोक असे म्हटले जाते. अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थ क्षेत्रांच्या जीर्णोद्धारासाठी झटत असताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरापर्यंत व जगन्नाथपुरीपासून सोमानथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहीरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर सर्वप्रथम घाट बांधून नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. सोलापूर शहरात धनगरसमाज मोठ्या गुण्या गोविंदाने राहत असून धनगर समाज हा सोलापूरातील मोठा समाज मानला जातो. अशी माहिती दिले.

                         पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. याप्रसंगी अप्पू उळागड्डे, नर्सप्पा पुजारी, विजय पुजारी, शिवा हक्के, शहर उपाध्यक्ष दिनानाथ धुळम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी स्वामी वर्गांटी, संदीप महाले, सिद्राम शेखशिंदी, सागर हलसगी, इरेश चिंचोळकर,सुरेश गोरकल, अंबिका कंटीकर, रवी मंदकल, शिव मंदकल आदींनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update