Maharashtra

ग्रँड मराठा फौंडेशन तर्फे गरजु महिलांना मदतीचा हात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ठाणे –  ग्रँड मराठा फौंडेशन तर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंसनगर विभागातील गरजु महिलांना मदतीचा हात देण्यात आला आहे. कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक घडी बिघडली आहे.मुलांची फी पासून घर कसे चालवायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने ठाणे शहरात मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. ही बाब लक्षात घेऊन आपल्या घरासाठी मेहनत घेणाऱ्या घरातील कर्त्या महिलांना कोरोना काळात थोडा हातभार म्हणुन आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप शिवसेना उपविभाग प्रमुख प्रभाकर (आप्पा )देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ग्रँड मराठा फौंडेशनचे मितेश देशमुख, रितेश देशमुख ,दीपक रत्नपारखी ,धीरज अहिरे ,भावेश देवगडकर आणी सोनाली देशमुख उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143