Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
कोरोना काळात सामूहिक स्पर्धेला फाटा देत घराजवळच रांगोळी स्पर्धेचे आगळे – वेगळे आयोजन
सोलापूर Competitions – श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या पावन नगरीत मकर संक्रातीचे औचित्य साधून भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घोंगडे वस्ती भवानी पेठ परिसरातील महिलांकरिता भव्य रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी निळकंठेश्वर मंदिराजवळ सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या रांगोळी स्पर्धेमध्ये भवानी पेठ परिसरातील किमान अडीचशे हून अधिक कुटुंब सहाभाग झाले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वरांजली चॅनेलचे रेणुका बुधाराम, माजी नगरसेविका निर्मला नल्ला, भरत कोल्हापुरे, मृणाली पात्रुडकर मंजुश्री इंडे, अनुशा अबत्तीनी, आनंद सिंगराल, श्रीपाद इराबत्ती आदींच्या हस्ते उद्घाटन थाटात करण्यात आले.
Competitions याप्रसंगी बोलताना आनंद सिंगराल म्हणाले की, मकर संक्रांत सण हा सोलापूरकरांचा मोठा सण आहे. सर्व धर्मीय नागरिक हे एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. परंतु यंदाच्या वर्षी देशात कोरोनाचे सावट असल्यामुळे घरातच राहून सण साजरा करा असे आव्हान केले. यंदाच्या वर्षीही रांगोळी स्पार्धेचे Competitions आयोजन करण्यात आले असून स्पर्धा मात्र आपआपल्या दारातच होईल व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येईल असे ते म्हणाले.
पूर्व विभागाप्रमाणे शहर उत्तर मध्येही तेलगुभाषिक नागरिक मोठ्या उत्साहाने मकरसंक्रात सण साजरा करतात. यंदा कोरोनाचे सावट असल्याने सण घराजवळ राहून साजरा करावे आणि रांगोळी ही आपल्या दारात काढावे असे आव्हान करत कार्यक्रम पार पडल्याची माहिती श्रीपाद इराबत्ती यांनी दिले.

रांगोळी स्पर्धा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विक्रम आबत्तीनी, शेखर इराबत्ती, मोहन मुडा, श्रीकांत जिठा, अक्षय तलकोकूल, रामू मंडी, किरण वल्लाल, राजकुमार कनकी, महेश जंपाल, गणेश कालवा, पूर्णेश येमुल, कृष्णा गुंडेटी. इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews