Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार आहे. किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली
राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?
#solapurcitynews