Guru Vandana Program Concluded
Solapur City

Guru Vandana : बसवारुढ मठाचे महास्वामी सद्गुरु श्रो. ब्र ईश्वरानंद महास्वामीजींचा 84 व्या जन्मदिनी गुरु वंदना कार्यक्रम संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर Guru Vandana – सोलापूर विमानतळ मागील कस्तुरबा नगर येथील सद्गुरु बसवारुढ महास्वामी मठाचे महास्वामी सद्गुरु ईश्वरनंद महास्वामीजी यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त (Birthday) रविवारी सायंकाळी गुरुवंदना कार्यक्रमाचे (Guru Vandana Program) आयोजन मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांनी केले होते या कार्यक्रमास खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुक शिवाचार्य, महापौर श्रीकांचना यन्नम माजी महापौर महेश कोठे, दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक उदय शंकर पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, माजी सभागृहनेता श्रीनिवास करली नगरसेविका सौ वरलक्ष्मी श्रीनिवास पुरूड, वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, सोमनाथ केंगनाळकर, मुंबईचे उद्योगपती सतीश कुलकर्णी एम के फाऊंडेशनचे महादेव कोणगुरे आदींसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सद्गुरु ईश्वरनंद महास्वामीजी यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त (Birthday) सत्कार करून महास्वामीजींकडून शुभ आशीर्वाद घेतले.

हे वाचा – आपल्यावरील भ्रष्ट व टक्केवारीचे आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेऊ नगरसेवक सुरेश पाटील

                 सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी यांचे परमशिष्य, मानवतावादी, सर्व धर्म समभावाचे पूजक श्रीविद्या उपासक सद्गुरु ईश्वर आनंद महास्वामीजी यांनी बसवारुढ मठाच्या माध्यमातून ज्ञान, अध्यात्म, समाजोध्दार कार्य अविरत केले सर्वधर्मसमभावाचे प्रतीकच बसवारुढ मठ आहे अप्पाजींच्या सानिध्यात येणारा प्रत्येक भक्तांचे उद्धारच झाले आहे असे मनोगत या वेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त करून आप्पाजींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या…. दरम्यान बसवारुढ मठाच्या माध्यमातून धर्मकार्य, लोककल्याणार्थ विविध धार्मिक पूजा व विधींचे आयोजन करण्यात येत असतात अप्पाजींचे हजारो साधक नियमित मठात येत असतात बसवा रोड मठावर त्यांची अफाट श्रद्धा असल्याचे मनोगत यावेळी मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांनी व्यक्त केलं.. यावेळी एमके फाउंडेशन च्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अप्पाजींचे वाढदिवसाचे औचित्य साधून सायकल वाटप करण्यात आले. गुरुवंदना कार्यक्रमानंतर मठाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अप्पाजींचे हजारो भक्त या गुरुवंदना कार्यक्रमास उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews