Economy

आईला न्याय मिळावा यासाठी मुलाचे लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती बाहेर अर्धनग्न आंदोलन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

खोटे काम करणाऱ्या कर निरीक्षकाला निलंबित करण्याची गायकवाड कुटुंबियांची मागणी
ठाणे – कर्ज देतो म्हणून सावकाराने फसवून हिराबाई गायकवाड या जेष्ठ नागरिक महिलेचे घर नावावर करून घेतल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे.फसवणूक झाल्यावर गायकवाड कुटुंबीयांनी पोलिसांना तक्रार केली त्यांनतर ठाणे महापालिकेचा लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीत आपली हरकत नोंदवून माझे घर इतर कोणाच्या नवे करू नये असे लेखी पत्र दिले असे असताना या प्रकरणी हेरिंग घेऊन न्याय निवड करणे अपेक्षित असताना देखील कर निरीक्षकाने असे काही न करता घर दुसऱ्याच्या नावावर करण्याची प्रकिया सुरु केली याबाबत वारंवार सांगूनही महापालिका अधिकारी गायकवाड कुटुंबियांचे काहीच ऐकून घेत नसल्याने अखेर हिराबाई गायकवाड यांच्या मुलाने लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती कार्यालय बाहेर अर्धनग्न होऊन आंदोलन केले यामध्ये गायकवाड कुटुंब सहभागी झाले होते.याप्रकराबाबत अधिक माहिती घेऊन येत्या सोमवारी हेरिंग घेण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितले.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143