Health Maharashtra

महाराष्ट्र महिला विकास मंचाच्या वतीने आरोग्य व व्यवसाय संधी शिबीर संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

लातूर- लातूर शहरात महाराष्ट्र महिला विकास मंचच्या वतीने महिलांना जीवनात रोजगाराभिमुख बनवण्यासाठी मकर संक्रांत निमित्ताने तिळगुळ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची सदृढ आरोग्यासंबंधी माहिती देण्यात आले. महाराष्ट्र महिला विकास मंचाच्या राज्य अध्यक्ष कालिंदी पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून या सोबत महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी महिला विकास मंचाच्या वतीने घरबसल्या गृहाउद्योगातून स्वावलंबी बनवण्यासाठी व्यवसायांच्या संधी कोणत्या आहेत या लघु अथवा गृह उद्योगातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम कस करता येईल याबद्दल शिबिर घेण्यात आले आहे. यासोबतच वैयक्तिक स्वच्छता व संभाव्य रोग टाळण्यासाठी उपाययोजना याबाबत पुणे येथील डॉ अशोक जमादार यांनी मार्गदर्शन करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य व व्यवसाय प्रशिक्षक प्रविण साळुंके यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी लातूर जिल्हाध्यक्षा बबिता साळुंके, कविता कवे यांनी महिला सक्षम व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्ह्यात कार्य करत आहेत. अशी माहिती महाराष्ट्र महिला विकास मंचाच्या राज्य अध्यक्ष कालिंदी पाटील यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143