Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- प्रभागातील नागरिकांसाठी गोलचावडी नागरीक आरोग्य केंद्र व प्रभाग क्रमांक 3 यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोंगडे वस्ती इंदिरा वसाहत येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. याशिबिरात नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, इतर लक्षणे असणाऱ्यांना म्हैसम्मा देवी मंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी करण्यात आले. इंदिरा वसाहत भागात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत समाजसेवक सुरेश बिद्री यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना आरोग्य उपचारासाठी जनजागृतीसह आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शहरात सर्दी ताप खोकला वाढू नये यासाठी शहरभर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर घोंगडे वस्ती इंदिरा वसाहत भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. याप्रसंगी गोलचावडी नागरिक आरोग्य केंद्राचे डॉ. अलकुंटे, सौ. मिनाक्षी जाधव, श्रीनिवास नराल, आशा वर्कर सौ. सुजाता तुरुप, सौ. सविता आडकी आदींनी तपासणी केले. या नागरी आरोग्य शिबिरास एकूण 155 जणांनी सहभाग नोंदवले असून सर्दी, खोकला, ताप आल्यास वेळेतच इलाज करा असे आव्हान डॉक्टरांनी केले. याप्रसंगी सुरेश बिद्री, किरण वल्लाळ, नागनाथ गुलापल्ली, निखिल पाटील, विलास बिज्जा, नागेश निरंजन, नागेश बिद्री, मनोज मेंगजी आदींनी परिश्रम घेतले.
#solapurcitynews