Health Solapur City

मंद्रूप आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होणे आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.याच हेतूने मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार सुभाष देशमुख यांनी स्थानिक विकास निधीमधून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले. यावेळी आ. देशमुख यांच्यासह अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे , पं. स. सभापती सोनाली कडते, मंद्रूप सरपंच कलावती खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य केंद्रास ज्या ज्या सुविधा पाहिजे आहेत, त्या पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुरण्णा तेली, हणमंत कुलकर्णी, प्रशांत कडते, गौरीशंकर मेंडगुदले, मळसिद्ध मुगळे, डॉ. वाघमारे, विश्वनाथ हिरेमठ, आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com