Health Maharashtra

आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नंदुरबार –  ग्रामपंचायतीने किंवा गावातील दानशूर व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास खापर आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन मुख्य इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत  होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शैखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नारायण बावा, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मालखेडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाडवी म्हणाले, प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गुजरात लगत असल्याने गुजरात राज्यातील सीमावर्ती तसेच गावालगत मुख्य रस्त्यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या भागातील नागरिकांना या ठिकाणी चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याने या भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या केंद्रातील साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिंक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. मती वळवी म्हणाल्या, या आरोग्यवर्धिनी केंद्राचे काम खूप चांगले झाले आहे.  वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांच्या माध्यमातून येथील परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र तयार करण्यात आले असून त्यावर 1 कोटी 74 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच येथील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या नूतनीकरणासाठी 40 लक्ष निधी प्राप्त झाल्याची माहिती डॉ. बोडके यांनी यावेळी दिली. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले त्यानंतर त्यांनी आरोग्यवर्धिनी केंद्राची पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी जि.प. सदस्य प्रताप वसावे, सी.के.पाडवी, शंकर पाडवी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143